शहापूर:बेमुदत आमरण उपोषण दुसरा दिवस

सत्यशोधक जनसेवा समितीचे अध्यक्ष सुरेशभाऊ वावगे, समितीचे सचिव संजयजी बगाडे यांनी उपोषण मंडपाला भेट

शहापूर येथील शेतकऱ्यांची पारखेडे नामक व्यापाऱ्याने फसगत केली, एकूण 25 शेतकऱ्यांचे हरभरा तूर सोयाबीन, अशा शेतीमाल नेऊन एकूण 3 कोटी रुपयांनी फसगत केली, अशा शेतकऱ्यांच्या फसगत करणाऱ्या पारखेडे व्यापाऱ्यावर कार्यवाहीं करावी यासाठी, सत्यशोधक जनसेवा समितीचे अध्यक्ष सुरेशभाऊ वावगे, समितीचे सचिव संजयजी बगाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन, सदर व्यापाराविरुद्ध कारवाईची मागणी केली.

खामगाव (जनोपचार)दि. ५/०६/२४ पासुनग्रामपंचायत परिसर शहापुर ता. खामगाव जि. बुलढाणा येथे  दोन दिवसापासुन  ऊपोषणा आपल्या प्रमुख मागण्या ज्यामध्ये एफ. आय. आर नं १५२/२०२४ आर्थीक फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी नामे सुनिल हरिदास पारखेडे याला तत्काळ अटक करण्यात यावी.सदर प्रकरणाचा तपास (SIT) स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम किंवा (LCB) (लोकल क्राईम ब्रांच) कडे वर्ग करण्यात यावा. आर्थिक फसवणुक प्रकरणातील गरिव शेतकऱ्यांची झालेल्या आर्थिक नुकसानीची तात्काळ भरपाई करण्यात यावी. सदर प्रकरणात मुख्य आरोपी आणि सह आरोपी यांना मदत करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कार्यवाही करून त्यांना सदर प्रकरणात सह आरोपी बनविण्यात यावे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच सह आरोपी त्रयस्थ व्यक्ती मार्फत फिर्यादीवर दबाव आणत असुन खोट्या गुन्हयात गोवण्याच्या धमक्या देत आहे त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अपhaर प्रकरणातील आरोपी विविध नातेवाईकांच्या माध्यमातुन फिर्यादीवर प्रलोभने दाखवत असुन तपासामधे अडथळा निर्माण करत आहे त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा. सदर प्रकरणातील सह आरोपी यांना विद्यमान न्यायालयाने ज्या अटीशर्तीच्या अधिन राहुन जामिन दिला आहे त्याचा भंग सदर आरोपींनी केला आहे तेव्हा शासनाने (तपास अधिकारी) यांनी जामिन रद्द साठी तत्काळ अर्ज करावा. सदर प्रकरणात गरिब शेतकऱ्यांचे भरपुर आर्थिक नुकसान झालले असुन सध्या पिक पेरणीचे दिवस येत असुन त्याकरता शासनाने सदर प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची विल्हेवाट लावुन आर्थिक नुकसान भरून दयावे.

याकरीता सदर बेमुदत आमरण उपोषण  मधील संपूर्ण फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबिय ग्राम शहापुर ता. खामगाव जि. बुलढाणा येथे दोन दिवसापासुन बसले आहेत यामध्ये ऊपोषणकर्ते रामकृष्ण भिकाजी मोरखळे- वय. ६८रामदास नामदेव चराटे - वय ७१

भास्कर नारायण कोकदे- वय ५८

अजय रमेश लांडे- वय ३१

शैलेश हरिचंद्र ताले- वय ४०

राजेश भीमराव तिडके- वय ४० हे बसले आहेत

Post a Comment

أحدث أقدم