मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू : दरमहा मिळणार 1500 रुपये

ही बातमी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आजच आपले उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये हे दिले जाणार आहे व यासाठी निधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे.

तर भगिनींनो आपल्याला दरमहा हे 1500 रुपये कोणत्या योजनेअंतर्गत व कशाप्रकारे मिळणार आहे व यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत यासाठी पात्रता कोणती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल.
भगिनींनो आजच्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये अनेक नवीन नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामधीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमह 1500  रुपये हे मिळणार आहेत. 

या योजनेसाठी पात्रता
भगिनींनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 21 ते 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी निधी किती जाहीर झाला ते पहा
भगिनींनो  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या योजनेसाठी  निधी जाहीर केलेला आहे.

भगिनींनो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेसाठी 46000 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून पुढील 1 जुलै 2024 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया हे सुरू करण्यात येणार आहे. तसेच अर्ज सुरू झाल्यास थेट दर महा महिलांना 1500 हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.


❇️ सोप्या भाषेत समजून घ्या 

◾️वय 21 ते 60 वर्षे

◾️दरमहा 1500 रुपये मिळणार

◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार

◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 

❇️ पात्रता पहा 


◾️महाराष्ट्र रहिवासी 

◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल


❇️  कोण अपात्र असेल 

◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

◾️घरात कोणी Tax भरत असेल तर

◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

❇️ लागणारी कागदपत्रे 

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो


◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:

Post a Comment

أحدث أقدم