संविधान बचाओ म्हणणाऱ्यांनीच केला संविधान निर्मात्यांचा घोर अपमान -- आ.अँड फुंडकर
जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपाच्या वतीने केले तीव्र निदर्शने
*खामगाव* --निवडणुकीत प्रचारात संविधान बचाव च्या घोषणा देणाऱ्यांनीच संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला व आपली नीच विकृत प्रवृत्ती महाराष्ट्रासमोर मांडली असे प्रतिपादन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.स्थानिक टावर चौकातील भाजपा कार्यालयासमोर आज भाजपाच्या वतीने आ. अँड. आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली . आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
![]() |
जाहिरात |
याप्रसंगी माध्यमांची संवाद साधताना आ. अँड. आकाश फुंडकर पुढे म्हणाले की संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा संविधान बदलणार अशा खोट्या थापा देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांनीच संविधान बचाव अशा घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनीच संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जाहीर रित्या पत्रकारांच्या कॅमेरासमोर फाडून त्यांचा घोर अपमान केला. त्यामुळे यावरून समजून येते की केवळ राजकारणासाठी भाजप संविधान बदलणार असे जनतेसमोर खोटे व रेटून मांडणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड सारख्या मोठ्या नेत्यानी दाखवून दिले की ते किती संविधान प्रेमी आहेत , आणि ते किती डॉ.बाबासाहेबांच्या विचारसरणीवर चालतात हे आज संपूर्ण महाराष्ट्रासह भारताला दिसून आले.आव्हाडानी आपल्या विकृत मनोवृत्तीच दर्शन जाहीर रित्या माध्यमांसमोर केले .मनुस्मृती चा कोणताही प्रकारचा श्लोक कोणत्याही अभ्यासक्रमात येणार नाही परंतु भाजपा विरोधात काहीही अपप्रचार करायचा आणि जनतेला मूर्ख बनवत केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करायचा ही सवय जितेंद्र आव्हाड यांची नेहमीचीच आहे .परंतु यापुढे आता हे सहन करण्यात येणार नाही आव्हाड यांनी दलित समाज व सर्व महाराष्ट्राची माफी मागावी ,आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी आ. अँड. आकाश फुंडकर यांनी दिला.
.
إرسال تعليق