मुंबई वरुन अपहरण झालेल्या बालकाची शेगाव येथे सुटका
शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-दिनांक 26 मे 2024 रोजी मुंबई येथील पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीत एका 13 वर्षीय मोहम्मद आसिफ या बालकाचे अपहरण झाले याबाबतीत गुन्हा क्र 492/2024 कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई पोलिसांना हा बालक ट्रेन नं 12869 मध्ये असल्याचं समजल्यावर त्यांनी समजलं तसेच त्यांनी सीसीटीव्ही बघण्यासाठी गेले असता आरपीएफ च्या महिला प्रधान आरक्षक सविता इंगवले भेटल्या त्यांनी त्यांच्याच बैचमेट्स असलेल्या शेगाव येथील चर्चित प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांचा नंबर मुंबई पोलिसांना दिला आणि सम्पर्क होताच रंजन तेलंग यांनी गुप्तहेर पाठवून अपहरण झालेलं बालक एस 7 कोच मध्ये बसलेला असल्याचं माहीत करून शेगाव ला ट्रेन येताच त्याला रेस्क्यू केलं व त्याची सूचना मुंबई पोलिसांना दिली, त्यावरून आज त्या बालकाला विधिवत कार्यवाही पूर्ण करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा छडा लावणारे आरपीएफ चे दमदार प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी सहा महिन्यांपूर्वी एक सहा वर्षीय चिमुकली ला अपहरणकर्त्या च्या तावडीतून वाचवले होते हे विशेष. रंजन तेलंग यांच्या कामगिरी ने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले आहे
إرسال تعليق