पांडुरंग तेलंग यांचे 100 व्या वर्षी निधन
उद्या सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा
मोताळा: येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग जानोजी तेलंग यांचे आज दिनांक 19 मे रोजी वयाच्या 100 वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. स्वर्गीय पांडुरंग तेलंग हे शेगाव येथील आरपीएफ जवान रंजन तेलंग यांचे आजोबा होते त्यांच्या पश्चात. शंकर व भगवान अशी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 20 मे रोजी सकाळी 10 वाजता बुलढाणा अर्बन शाखा मोताळा येथून निघून मलकापूर रोड वरील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे. जनोपचार न्यूज नेटवर्क परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
إرسال تعليق