मातोश्री स्व सौ. सुशिलादेवी जोशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त सा. रुग्णालयात भोजन वितरण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-लॉयन्स क्लब खामगांवच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन नियमित पणे लॉयन्स अन्नछ्त्र या नावाने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन दररोज सा.रुग्णालयातील शेकडो रुग्णाना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वितरण करण्यात येत असते, या माध्यमातुन रुग्णाना मोठा आधार झाला आहे.
सराफा भागातील राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांच्या मातोश्री स्व सौ. सुशिलादेवी कचरुलाल जोशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त लॉयन्स अन्नछत्राच्या माध्यमातुन आज दि. 07 एप्रिल रोजी सा. रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णाना भोजण वितरण करण्यात आले. सर्वप्रथम गजानन महाराजांचे पुजन व पुष्पहार अपर्ण करुन रुद्र जोशी याच्या हस्ते गौमातेस गौग्रास लावुन या भोजन वितरणास सुरवात करण्यात आली यावेळी मोहनलालजी शर्मा ,ओमप्रकाश जी डायमा, नरेंद्र मावळे, शंभु शर्मा, ,अनिल पोतदार, जयेश जाधव, पप्पू शर्मा, शिप्रा जोशी, सौ.सुनिता जोशी सह लॉयन्स अन्नछत्राचे लॉ. किशोर गरड, लॉ. गिरीश धरमठोक आदि उपस्थित होते लॉयन्स अन्नछत्राच्या माध्यमातुन अन्नदान करावयाचे असल्यास इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. 9922862701, 9922181285
إرسال تعليق