उत्कृष्ट काम व अथक प्रयत्न केल्याबद्दल सौ चेतना मानकर यांचा आरोग्य विभाग कडून सत्कार
खामगाव प्रतिनिधी:- खामगाव तालुका शहरी व ग्रामीण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आज पिंपळगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच घाटपुरी कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविका सौ चेतना सतीश मानकर यांच्या कार्याची दखल घेत आज तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सन 2023 2024 या सत्रात आरोग्य सेवा सुविधा तसेच आरोग्य विभागाचे नावलौकिक वाढविण्याकरिता उत्कृष्ट नाविन्यपूर्ण काम आणि अथक प्रयत्न केल्याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आले स्थानिक नगर परिषद दवाखान्यांमध्ये आयोजित एका समारंभात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे,पिंपळगाव राजा प्रा.आ.केंद्र M.Oहाफिजा मॅडम,M.Oइंगळे मॅडम बोथकाजी तसेच समुदiय अधिकारी सह यितर वैद्यकिय अधिकारी यांची उपस्थीती होती.Advt.
إرسال تعليق