महिला मोहता विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ खामगाव तर्फे लिपिड प्रोफाइल रक्त तपासणी आणि कोलेस्ट्रल मार्गदर्शक तत्त्वे सेमिनार.


 इनरव्हील क्लब ऑफ खामगावच्या वतीने महिला मोहता विद्यालयात लिपिड प्रोफाइल रक्त तपासणी व कोलेस्ट्रॉल मार्गदर्शक तत्त्वे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची लिपिड प्रोफाइल रक्त तपासणी करण्यात आली.  या मध्ये बरेच शिक्षक व कर्मचारी यांचे लिपिड प्रोफाइल हे संतुलित नसल्याचे आढळून आले त्यामुळे इनरव्हील क्लबच्या वतीने लिपिड प्रोफाइल व संतुलित आहार या विषयावर आधारित चर्चा सत्र शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साठी आयोजित करण्यात आले. क्लब च्या सदस्या सदस्या आणि डाएटिशियन सौ. उज्ज्वला घुले यांनी त्यांना त्यांच्या आहारात काय खावे, वाढत्या वयाबरोबर कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि या समस्यांपासून मुक्ती कशी मिळवावी, नुट्रीशनल सप्लिमेंट म्हणजे काय, त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व, त्याचे फायदे हेही आमच्या डायटीशियन उज्ज्वला घुले यांनी सांगितले.  आपल्याला रोजच्या आहारात कोणती औषधे घ्यावी लागतात आणि कोणत्या गोष्टी संतुलित आहार म्हणून घ्याव्या लागतात ह्यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला.
 या तपासणी व चर्चासत्रात महाविद्यालयातील २० शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.  सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पेन देऊन सत्कार करण्यात आला. आहारतज्ज्ञ उज्ज्वला घुले यांचा रोप आणि हाताने बनवलेली सीडी देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चासत्रासाठी कॉलेजच्या हेड मेधा देशपांडे यांनी इनरव्हील क्लब ऑफ खामगाव आणि श्रीमती उज्ज्वला घुले यांचे आभार मानले.  प्रोजेक्ट चेअरमन प्रिया पटेल यांनीही क्लब च्या डायटीशियन उज्ज्वला घुले, कॉलेजचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे आभार मानले.  सीसी अनिता गोयंका यांनी ही माहिती दिली.

Post a Comment

أحدث أقدم