फुकट फुकट फुकट फुकटच...
"ऑनलाइन" कार्यकर्ता ईश्वर पांडव यांचे जिल्हाभरात कौतुक
नांदुरा:(नितेश मानकर जनोपचार न्यूज नेटवर्क):- तुम्हाला कमाल वाटेल मात्र असं होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात एक असाही कार्यकर्ता आहे. ज्याच्यामुळे निराधार वृद्धांना "ऑनलाईन मार्ग" मिळाला आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं त्यांचं नाव आहे ईश्वर पांडव!
गेल्या चार वर्षापासून ईश्वर पांडव यांनी नांदुरा तालुक्यातील गरजू शेतकरी मजुरांसाठी व निराधांना ऑनलाइन अर्ज भरून देण्याच्या कामाचा सपाटा सुरू केला आहे आणि तोही अगदी "फुकट फुकट आणि फुकट"!
महिन्याच्या प्रत्येक सोमवारी गरजू नागरिकांसाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारने योजना काढली मात्र या योजनेतील कागदपत्रांची जुळवा जुळवा आणि ऑनलाईन चा खर्च देखील गरिबांना झेपत नाही अशावेळी अनेक लाभार्थी वंचित राहतात त्यामुळे ईश्वर पांडव यांनी चार वर्षांपूर्वीच दर सोमवारी गरजू व लाभार्थी नागरिकांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली चार वर्षात त्यांनी कित्येक गरजूंना लाभ मिळवून दिला आहे अगदी सोशल मीडियावर देखील त्यांची माहिती देणारी पोस्ट अविरत सुरू आहे. ईश्वर पांडव यांनी यापूर्वी वीज मंडळ असो वा नागरिकांवर होणारा अन्याय ते नेहमी अग्रेसर राहून कामे करून घेतात ही त्यांची वेगळी ख्याती आहे. त्यांनी सुरू केलेल्या कार्याची जिल्हाभरात दखल होत असून त्यांच्या कार्याचे कौतुक देखील होत आहे.
إرسال تعليق