लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 'या' तारखेला लागणार निकाल...7 टप्प्यात होणार मतदान!
देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेत सांगिलते. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कूमार यांनी ही घोषणा केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकांना १९ (शुक्रवार) एप्रील २०२४ पासून सुरुवात होणार आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. दिड कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. तर साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. ७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
पहील्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रीला होणार आहे. दुसरा टप्पा - ४ (गुरुवार) एप्रिल पासून अर्ज भरता येणार तर २६ (शुक्रवार) एप्रिल २०२४ ला मतदान होणार आहे.तिसरा टप्पा - ७ (मंगळवार) मे ला मतदान होणार आहे. तर १२ राज्यांमध्ये निवडणुका होणार चौथा टप्पा - १३ (सोमवार) मे ला मतदान पाचवा टप्पा - २० (सोमवार) मे ला मतदान सहावा टप्पा - २५ (शनिवार) मे ला मतदान
सातवा टप्पा - १ (शनिवार) जून ला मतदान
महाराष्ट्रात २० मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे.
إرسال تعليق