शासकीय तंत्र निकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघाची सर्वसाधारण सभा आनंदमय वातावरणात संपन्न

नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती



शासकीय तंत्र निकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघाची 5 वी सर्वसाधारण सभा आज 20 मार्च 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन  खामगाव येथील सभागृहात संपन्न झाली.यापूर्वी सर्व सभासदांना नाश्ता देण्यात आला.पहिल्या सत्रात नविन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश वीरमाणी होते.या प्रसंगी जनार्दन भानुसे, प्राचार्य डॉ.समीर प्रभुणे, रमेशचंद्र गट्टाणी, मदनमोहन जोशी , एस पी कुलकर्णी उपस्थित होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते 

या प्रसंगी सचिव रमेशचंद्र गट्टाणी यांनी संस्थेचा गेल्या ५ वर्षाचा लेखाजोखा मांडला.त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच रमेशचंद्र गट्टाणी यांनी नवीन कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले. जुने कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी माजी विद्यार्थी मोहम्मद फारुक यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात ४२ वर्षे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पहार , शाल , मेमेन्टो देऊन सत्कार करण्यात आले

जाहिरात

दरम्यान काही दिवंगत सभासदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.राष्ट्रगीतानंतर सर्व सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.माजी विद्यार्थी संघाच्या सभागृहात दुपारी  3.00 वाजता दुसरे सत्र सुरू झाले.यावेळी सचिव रमेशचंद्र गट्टाणी यांच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना सर्वानुमते पदांची नियुक्ती करण्यात आली.या नवीन कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष जनार्दन भानुसे, उपाध्यक्ष  मोहम्मद  फारुक, उपाध्यक्ष नारायण अकर्ते , सचिव संजय कुलकर्णी , सह सचिव प्रवीण मोहता ,सह सचिव सारंगधर हिंगणे ,कोषाध्यक्ष  रामकृष्ण जवकार , कार्यकारी सदस्यांमध्ये शशिकांत कुलकर्णी , मकरंद वढावकर , सुरेश घोडके , दयाराम खारोले , प्रविण मोहता, शैलेंद्र काळे, भावेश धांडे , सुभाष टाले, सारंगधर तराळे‌ ,विजय तराळे, जयराज छंगाणी , दुशांत केडिया , वैशाली शंकर पाटील यांचा समावेश आहे.5 वर्षाच्या काळात सर्वांच्या वतीने मिळालेल्या बहुमुल्य सहकार्य बद्दल सतीश विराणी व रमेश चंद्र गट्टाणी यांनी सर्व सदस्यांचे आभार  मानल

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم