भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी राज पाटील 

तर विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष पदी प्रतीक मुंढे पाटील यांची निवड

भारतीय जनता पार्टी खामगाव तालुक्याची काही दिवसा आधी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील श्री.राज दिलीपराव टिकार पाटील यांनी खामगाव तालुका सह शहरामध्ये गेल्या 5 वर्षापासुन साम्राज्य प्रतिष्ठान च्या माध्यमातुन युवकांची मोठी फौज निर्माण करुन विविध क्षेत्रा मध्ये समाजकार्याचे काम चालू केले होते. याचीच पावती म्हणून त्यांना 2021 साली खामगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी त्यांच्यावर भाजपा विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदाची धुरा सोपविली व ढोरपगाव येथिल चि.प्रतिक समाधान मुंढे पाटील हे देखिल अतिश्य कमी वयात सामाजिक कार्यात  अग्रेसर होते व त्यावेळी त्यांना देखिल भाजपा विद्यार्थी आघाडीच्या तालुका सरचिटणीस पदाची धुरा सोपविण्यात आली होती. पक्षाचे विविध कार्यक्रम असो व कोणते ही सामाजिक कार्य असो त्यामध्ये ही राम लक्ष्मणाची जोडी सदैव अग्रेसर असायची. पक्षाने वेळो वेळी दिलेल्या सर्व जवाबदार्या मग त्या काळात पक्षाचे सरकार नसताना विविध प्रकारचे आंदोलन करायचे असो की पक्षाच्या वतिने आयोजित रैल्या,सभा असो हे दोघे खामगाव तालुक्यातील युवकांना सोबत घेऊन ते कार्य योग्य नियोजनात पार पाडत असत.

जाहिरात.

त्यांच्या या नियोजन पद्दतीची तसेच पक्षाने दिलेल्या जवाबदारी ला योग्य वेळी न्याय देण्याच्या प्रवृत्ती ची दखल घेऊन पुन्हा एकदा खामगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अँड.आकाशदादा फुंडकर यांनी श्री.राज दिलिपराव टिकार पाटील यांची भारतिय जनता युवा मोर्चा खामगाव तालुकाअध्यक्ष पदी तर प्रतीक समाधान मुंढे पाटील भाजपा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष पदी यांची निवड केली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोघांनाही भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..

Post a Comment

أحدث أقدم