समाजातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार!
रॉयल राजपूत पदमावती महिला मंडळाचा निर्धार
खामगाव : येथील रॉयल राजपूत रॉयल राजपूत पद्मावती महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा मंगळवारी सायंकाळी संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात समाजातील 250 पेक्षा महिलांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
राजपूत समाजातील महिला आणि युवतींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या मेळाव्याची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उखाणे स्पर्धा,एक मिनिट स्पर्धा, संगीत खुर्ची, नेतृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रिया राजपूत ज्योती पवार ज्योती राजपूत चेतना पाटील उषा इंगळे आदींची उपस्थिती होती.संचालन राजपूत छाया चव्हाण यांनी वनिता राजपूत,छाया चव्हाण यांनी केले
إرسال تعليق