युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे 41 व्या हनुमान चाळीसा निमीत्त हिंदू हुंकार सभेचे आयोजन

खामगाव-प.पु.श्री. नाना-काका माऊलीच्या आशिर्वादाने गेल्या ४० शनिवार पासुन  युवा हिंदू प्रतिष्ठान कडून हिंदू धर्माच्या एकत्रिकरणासाठी शहरासह ग्रामीण भागातील विविध परिसरात सामूहिक हनुमान चाळीसा राबविण्यात येत आहे. शहरासह ग्रामिण भागात विविध ठिकाणी हा पठण उपक्रम उत्साहाने आणि निर्विघ्नपणे पार पडले. त्याबद्दल युवा हिंदू प्रतिष्ठान कडून ४१ व्या सामुहीक हनुमान चालीसेचे औचित्य साधून रविवार  ‘दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा येथिल न प शाळा क्रमांक 6 येथे   हिंदू हुंकार सभेचे ‘ आयोजन करण्यात आले आहे.


         आयोजित हुंकार सभेत प्रमुख वक्ता म्हणून सुदर्शन न्युज चॅनेल चे प्रधान संपादक धर्मयोद्धा डॉ सुरेश चव्हाणके,मार्गदर्शक बालयोगी उमेशनाथ महाराज (पिठाधीश्वर, श्री क्षेत्र वाल्मिकी धाम, उज्जैन)स्वामी श्री. भारतानंद सरस्वती जी महाराज (हिंदू शक्तिपीठ, पालघर) हे मार्गदर्शन करणार आहेत.तर प्रमुख उपस्थितीत  प्रतापराव जाधव(खासदार, बुलडाणा लोकसभा)आ. अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर(आमदार, खामगांव विधानसभा)स्वामी वासुदेवानंदजी सरस्वती(वासुदेव सांदीपनी आश्रम, निमगांव जि. बुलडाणा) हे उपस्तीत राहणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم