बुलडाणा लोकसभेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार :- मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केला निर्धार..!
जनोपचार (विक्की सारवान)"शिवसंकल्प अभियाना" अंतर्गत शिवसेना पक्षाची मिशन ४८ ची लोकसभा जाहीर सभा आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मुख्यमंत्री मा.एकनाथ जी शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या सभेला संबोधित करताना विरोधकांनी केलेल्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील खामगांव- जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के हिस्सा राज्य सरकार देईल, लोणार सरोवर संवर्धनासाठी ३६९ कोटी रुपये आणि पेनटाकळी जलसिंचन प्रकल्पाला ५०० कोटी दिले आहेत, तसेच वैनगंगा- पैनगंगा नदीजोड योजनेला मंजुरी दिली जाईल असेही मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत, धनुष्यबाण टिकावा यासाठी दीड वर्षांपूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे आज अनेक शिवसैनिक आमच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी सोबत येऊन जोडले जात आहेत.
वंदनीय शिवसेनाप्रमुख हे कार्यकर्त्यांना आपले मानायचे, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे असं त्यांचं मत
إرسال تعليق