आदर्श ज्ञानपीठ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



 स्थानिक घाटपुरी नाका येथील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव येथे प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चंदू भाऊ मोहता हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री के आर राजपूत, श्री दर्शन सिंह ठाकुर, श्री विनोद भाऊ बिडवानिया, अडव्होकेट रमेश जी भट्टड हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व तिरंगा ध्वज फडकवून करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान वाचून झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पीच दिल्या. यावेळी इसरो द्वारा आयोजित सायन्स स्पर्धेतील विजेत्यांना तसेच माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर व रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसे व प्रमाणपतत्रे देऊन गौरवण्यात आले. आयोध्या येथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त घेण्यात आलेल्या व्हिडिओ रील  मेकिंग स्पर्धेत विजेत्या  विद्यार्थ्यांना कॅश प्राईस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते  गौरवण्यात आले. मान्यवरांनी आपल्या स्पीच द्वारे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटून करण्यात आलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी देशमुख तर आभार प्रदर्शन सारिका सरदेशमुख यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका ममता महाजन, प्रियंका राजपूत, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, दामिनी चोपडे, प्रिया देशमुख, सारिका सरदेशमुख, प्रतीक्षा साबळे, संगीता इंगळे, प्रियंका वाडेकर, ऋतुजा गिरी, अश्विनी वक्ते, कोमल आकणकर, सपना हजारे,वंदना गावंडे, संगीता पिवळाटकर, सुवर्णा वळोदे, राजकन्या वडोदे, प्रतिभा गावंडे, लटके  आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم