खामगाव येथील कुख्यात गुंड ऋुत्विक ईंगळे यास केले स्थानबध्द….

पोलिस स्टेशन खामगाव शहर येथील धोकादायक इसमांस एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…..



खामगाव(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,खामगांव शहर पोलिस स्टेशन अंतर्गत कोठारी फैलधोकादायक इसम ऋतिक  इंगळे, वय २२ वर्ष, रा. कोठारी फैल, खामगांव ता. खामगांव जि. बुलढाणा
याचवर अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, गैरकायदयाची मंडळी जमवुन मारामारी करणे, जबरी चोरी, चोरी असे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याचे वरयापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन  जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर गुन्हेगार हे हातभटटीवाला व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यांना एक वर्षाकरीता बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २४ रोजी पारीत केला.

सदर गुन्हेगारांच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता खामगाव शहरचे तात्कालीन  ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पोलिस अधीक्षक, बुलढाणा सुनील कडासने यांचे मार्फत त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांना सादर केला होता.

जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांचे आदेशावरून ऋतिक रमेश इंगळे याचा तात्काळ शोध घेऊन त्याला सदरचा आदेश तामील करून त्यांना दि २४ रोजी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, सुनील कडासने, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, बी.बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक अशोक लांडे, पोना. संजय भुजबळ यांनी तसेच पो.स्टे. खामगांव शहर
येथील तत्कालिन ठाणेदार शांतीकुमार पाटील व पोलिसनिरीक्षक नरेंद्र ठाकरे ,पोहवा. अरुण हेलोडे, पोशि राम धामोडे यांनी परिश्रम घेतले. बुलढाणा जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती  संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरूध्द एम.पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति आहे.


Post a Comment

أحدث أقدم