ओंकारआप्पा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी प्रिमीअर लीग यशस्वी संपन्न

खामगाव - श्री तानाजी व्यायम शाळेचे सचिव ओंकारआप्पा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी प्रिमीअर लीग बक्षिस वितरणाने उत्साहात संपन्न झाली.


           ओंकारआप्पा तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तानाजी कबड्डी संघाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे तीन दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. १२ जानेवारी रोजी राजमाता मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीदिनी माऊसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करून सुरूवात झाली. १२, १३ व १४ जानेवारी दरम्यान शिवनेरी, योध्दाज, जंजिरा पलटन, रायगड वारियर्स, पन्हाळा फायटर्स, सिंहगड लॉयन्स, प्रतापगड पॅथर्स या संघामध्ये कबड्डी स्पर्धा झाल्या. १४ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयवर श्री तानाजी व्यायम शाळेचे सचिव ओंकारआप्पा तोडकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी आमदार ॲड.आकाश फुंडकर, सागर फुंडकर, पत्रकार बांधव यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, तानाजी महिला मंडळ, मोठी देवी सेवाधारी मंडळ तसेच सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी ओंकारआप्पा तोडकर यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर कबड्डी स्पर्धेच्या अंतीम सामन्याला सुरूवात झाली. यामध्ये रायगड वारियर्स विरूध्द शिवनेरी योध्दाज या दोन संघामध्ये अंतीम लढत होवून रायगड वारियर्स हा संघ प्रथम विजय ठरला.  विजयी संघाला आमदार ॲड.आकाश फुंडकर, ओंकारआप्पा तोडकर, शरद वसतकार, राजेश झापर्डे, आशिष चौबिसा, दर्शनसिंह ठाकूर, मामा देशमुख, संजय अवताडे, अमोल अंधारे, राकेश राणा, तानाजीराव घोगरे, अशोकराव ढगे, शिवाजीराव राऊत, मारोतीमामा चौहाण तसेच पत्रकार किशोरआप्पा भोसले, शरदबाप्पु देशमुख, किरण भाऊ मोरे, योगेश हजारे, संभाजीराव टाले, आनंद गायगोल,सिद्धांत ऊबंरकार, मुबारक खान,सुमितपवार, आकाश पाटील,गणेश पांनझाडे, सुनील गुळवे,महेंद्र बनसोड, अविनाश घोडके,आशिष पवार, संतोष करे, आकाश शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. तर मॅन ऑफ द टुर्नामेंट सोमेश शिंदे, बेस्ट रेडर ऑफ टुर्नामेंट रणजित भोसले, बेस डिपेंटर ऑफ टुर्नामेंट प्रथमेश चौधरी, ओम राऊत तसेच मुमेंट ऑफ द मॅच अनिकेत शेळके या विजत्यांना आकर्षित भेटवस्तू व मानचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी हनुमान व्यायाम मंडळाचे अशोक डिसले, संतोष भोकरे, पवन पाठक, सिध्दांत गरड या पंचांनी व स्कोरर शुभम इलामे, नयंत केकान यांनी सहकार्य केले. यावेळी तानाजी मंडळाच्या वतीने बाबुरावसेठ लोखंडकार, एन.टी.बाप्पू देशमुख, डॉ.जैन, अनिल नावंदर, धनंजय वाजपे, अजय माटे, अमोल आवटे या मान्यवरांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दारू बंदी विभागाचे निरीक्षक विकास पाटील, गणेश माने, राम बोंद्रे, नरेंद्र मावळे, प्रविण कदम, रमाकांत गलांडे, विकास चव्हाण, सुरेश घाडगे, शाम आंबेकर, चंद्रकांत रेठेकर, अशोक वसतकार, राजेश सोनले, अनिताताई तनपुरे, लताताई गरड, वैशालीताई काकडे, धनंजय देशमुख, शेखर पुरोहीत, अरूण भोसले, श्रीकिसन पुरवार, संतोष डिडवाणी, राजेश राजोरे,मुन्ना पुरवार, सतीषआप्पा दुडे, गणेश मानेकर, शाम पाडोळे, संजय घोगरे,अतुल सुकाळे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन राजेश मुळीक तर आभार प्रदर्शन प्रसाद तोडकर यांनी केले. या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील शेकडो युवकांसह परिसरातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी लावण्यात आलेला माऊली साउंडचे लायटींग ट्रस्ट, डिजे साउंड व कबड्डी मॅट विशेष आकर्षण ठरले. इलेक्ट्रीक फायर शॉट व फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमासाठी तानाजी व्यायम शाळेच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कबड्डी संघाच्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم