जय गजानन अंबिशन अकॅडमी खामगाव 10 वि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 14 जानेवारी 2024 रोजी संपन्न 


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- जय गजानन अंबिशन अकॅडमी अंतर्गत खमगाव तालुक्यातील 10 वि च्या विद्यार्थ्यांसाठी *Briiliant Students Test*चे आयोजन करण्यात आले होते या टेस्ट ला खमगाव तालुक्यातून 1600 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला त्यातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गोतमारे सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खमगाव मधील सुप्रसिध्द डॉक्टर आकाश खेडकर व केशवभाऊ पेसोळे उपस्थित होते.या टेस्ट मधून पहिला विद्यार्थी पियुष खेकडे हा असून त्याला गणेशाची चांदी ची फ्रेम व 5000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.तर द्वितीय बक्षीस संकेत काचरे या विद्यार्थ्याला गणेशाची चांदी ची फ्रेम व 3000 रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.तृतीय बक्षीय ओम थोलबरे व यजीत गुप्ता याना चांदी ची फ्रेम व 1000 रक्कम देऊन गौरविण्यात आले.सोबतच पहिल्या 100 विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन नवथळे सरांनी केले श्रेया पाटेखेडे  विद्यार्थिने स्वागत गीत तर प्रास्ताविक ओमीनी नवथळे मॅडम ने केलेविद्यार्थ्यांनी तणाव मुक्त होऊन अभ्यास कसा करावा यावर दिप्तीका कुलकर्णी मॅडम ने मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन राज राठी सरांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم