जिरेमाळी समाज बांधवांच्या वतीने...

योगेशभाऊ हजारे ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानीत

खामगाव (का.प्र.)- जिरेमाळी समाजाचे को


णतेही काम असो, रात्र असो वा दिवस साची पर्वा न करता गेल्या 20 वर्षापासून योगेशभाऊ हजारे कोणतीही अपेक्षा न ठैवता काम करीत आहेत. दवाखाना, पोलिस स्टेशन, कोर्ट असो वा इतर कोणतेही काम ते त्वरीत मदतीला धावतात. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, राज्यस्तरीय युवक-युवती मेळावे, भिडे गुरूजींच्या विरोधात आंदोलन, सामान्य रूगणालयास महात्मा ज्योतीराव फुले नाव देण्याची मागणी, माळी समाजातील नेत्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे, विविध उपक्रमातून समाज जागृती, माळी सेवा मंडळाचे  ‘युवा संघटन’ माध्यमातून युवकांमध्ये जागृृती व समाजाप्रती प्रेम निमार्ण केले. सकल माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासोबतच शोषीत, वंचित, कष्टकरी, शेतकरी बांधवांचे प्रश्न आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून ते सोडवितात. असे विविधांगी समाजाचे नेतृत्व असलेले श्री. योगेशभाऊ हजारे यांचा समाजाने आपले नेतृत्व म्हणून स्विकारून मुंबई, ठाणे,नाशिक, वाशिम, अकोला व नागपूर, अमरावती येथील कार्यक्रमातून त्यांना माळी समाजाने एक सच्च्या कार्यकर्ता म्हणून मानसन्मान दिला आहे. म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिरेमाळी समाज बांधवांच्या वतीने माळी भवन येथे सामाजिक कार्यकर्ते योेगेशभाऊ हजारे यांचा ‘समाजरत्न’ पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

याच कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर श्री पुरूषोत्तमभाऊ बोराडे (ग्रामसेवक सुटाळा बु.), विजयराव सोनवणे पिंपळनेर, अरूणभाऊ घोडे अकोला यांनाही त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून समाजरत्न पुस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.


Post a Comment

أحدث أقدم