गो से महाविद्यालयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी प्रशिक्षण नोंदणी अभियान
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त युनिसेफ द्वारा करिअर कट्टा उपक्रमांतर्गत डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी ह्या विषयावर दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवशी एक लाख 11 हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन विश्वविक्रम करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे.ह्या प्रकल्पांतर्गत स्थानिक गोसे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे नोंदणी अभियान अतिशय उस्फूर्तपणे राबविल्या जात आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2023 परीक्षा सुरू असताना सुद्धा नोंदणी अधिकाधिक होईल याकरिता प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर स्वतः कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या प्राध्यापकांच्या समवेत करिअर कट्टा समन्वयक डॉ विद्याधर अथवार व डॉ जे डी पोरे यांनी परीक्षा संपल्यानंतर एकत्रित विद्यार्थ्यांना बसून विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी तिथेच सोडवल्या जाव्यात याकरिता सर्वांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने सभा घेऊन प्रत्यक्ष नोंदणी करून घेतल्या जात आहे.शिक्षक पालक योजनेअंतर्गत प्रत्येक प्राध्यापकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊन त्यांचे कडून प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे व नोंदणी आढावा दररोज ऑनलाईन सभेद्वारे प्राध्यापकांकडून प्राचार्यांद्वारे घेतल्या जात आहे.निश्चितपणे अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊन या विश्वविक्रमामध्ये गोसे महाविद्यालयाचा खारीचा वाटा असणार आहे असा विश्वास प्राचार्य धनंजय तळवणकर तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स चे समन्वयक डॉ. विद्याधर आठवर यांनी व्यक्त केला. नोंदणी करिता विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह दांडगा असून करिअर कट्टाचे विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
إرسال تعليق