श्री शिवाजी व्यायाम मंदिर येथे ५ नोव्हेंबरला जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ॲम्युचर कबड्डी असो.चे आवाहन
खामगाव ■ सर्व सिनीअर पुरुष व महिला तसेच ज्युनिअर व सबज्युनिअर मुले-मुली यांच्या विदर्भ राज्य अंजिक्यपद कबड्डी स्पर्धा यवतमाळ, अमरावती व परतवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेत बुलढाणा जिल्हा कबड्डी संघ सहभागी होणार असून जिल्हयाच्या संघात निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत भाग घेणार आहे.
या स्पर्धाकरीता बुलढाणा जिल्हा कबड्डी संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री शिवाजी व्यायाम मंदिर, पुरवार गल्ली, खामगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून गोकुलसिंहजी सानंदा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, विरप्रतापजी थानवी, कबड्डी असो, अमरावती अध्यक्ष जितेंद्रसिंग ठाकुर, सहसचिव सतीश डफले, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा, खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, विदर्भ हौशी कबड्डी असो. चे सचिव अषोकarry देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेकरीता खेळाडुंची पात्रता सिनीअर खेळाडु पुरूष गटाकरीता वजन ८५ किलो, तर महिला गटाकरीता वजन ७० किलो असून वयाची मर्यादा नाही. ज्युनिअर मुले करीता
![]() |
Advt. |
७० किलो वजन, मुलींकरीता ६५ किलो वजन गट असून या खेळाडुंचा जन्म ३१ डिसेंबर २००३ नंतरचा असावा. सब ज्युनिअर मुले व मुलींकरीता ५५ किलो वजन गट ठेवण्यात आले असून खेळाडुंचा जन्म ३१ डिसेंबर २००७ नंतरचा असावा, या स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता जिल्ह्यातील सर्व खेळाडुंनी त्यांचे आधारकार्ड व वयाचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. जे खेळाडू विदर्म अॅम्युचर कबड्डी असो. अमरावती रजिष्टर नंबर ६७६ या संस्थेशी संलग्न असतील त्यांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. तरी या निवड चाचणी स्पर्धेत बुलढाणा जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडुनी सहभाग घेवून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा कबड्डी असो. चे महासचिव महावीर थानवी यांनी केले आहे.
إرسال تعليق