नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज खामगांवच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
खामगांव (नितेश मानकर)येथील नामांकित अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज ही शैक्षणिक संस्था १९४२ मध्ये स्थापन झाली. आजपर्यंत उत्कृष्ठ दर्जाची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या संस्थेचे हजारो विद्यार्थी राज्यात, भारतात व किंबहुना संपूर्ण जगात विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. या शाळेतून माध्यमिक शालांत व कनिष्ठ महाविद्यालयीन परिक्षा उत्तीर्ण करून बाहेर पडलेल्या देव आज सर्वदूर आपआपल्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा मेळावा 'स्कूल चले हम' व स्नेहमिलन शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थानिक मोहता महिला महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
नॅशनल हायस्कूल अॅल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभास खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार व हायस्कूलचे माजी विद्यार्थी अॅड. आकाशदादा फुंडकर, नॅशनल हायस्कूलचे उपप्राचार्य श्री. हेरंब दिगंबर, नॅशनल एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रविणजी चोपडा, संचालक श्री. दिनेशजी संघवी, माजी प्राचार्य श्री. शा.ना. बोदडे, माजी प्राचार्य श्री. बी. आर. हुरसाड, अॅल्युमिनी असो. चे उपाध्यक्ष डॉ. सी. एम. जाधव, डॉ. पंकज मंत्री, सचिव श्री. विनोद डिडवाणीया, कोषाध्यक्ष अॅड. श्रीकांत निखाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन, सरस्वती पूजन व राष्ट्रगीताने झाली. अॅल्युमिनी असो. चे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर यांनी स्वागतपर भाषणात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश व शाळेच्या विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत विस्तृत माहिती दिली. तद्नंतर नुकत्याच स्थापन झालेल्या नॅशनल हायस्कूल अॅल्युमिनी असोसिएशनच्या संस्थापक सदस्य व पदाधिकाऱ्यांचा परिचय उपस्थितांना करण्यात आला तसेच माजी प्राचार्या श्रीमती वनमाला अणे व विविध मान्यवरांनी पाठविलेल्या व्हिडीओ शुभेच्छा संदेश प्रस्तुत करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी हायस्कूलचे दिवंगत शिक्षक वृंद व माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रध्दांजली देऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी प्राचार्य श्री. शा. ना. बोदडे व श्री. वि. आर. हुरसाड, तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री. एम. व्ही. गुजराथी, श्री. एस.जी. शर्मा, श्री. डी.बी. माळी सर, श्री. एस.एन. खर्चे, श्री. एस. जी. कुळकर्णी, श्री. ए. एस. मगर, श्री. तुकाराम निखाडे, श्री तोडकर सर, सौ. शेवडे मॅडम, सौ. पांडे मॅडम, सौ. कुयरे मँडम, सौ. बोदडे मॅडम, श्री. हरिभाऊ खंडारे सर, सौ. खंडारे मॅडम, श्री. धोरण सर, श्री. अंबिलकर सर, सौ. सुमन तापी मॅडम, श्री. विठ्ठलराव सातपुतळे, श्री. नवनीत चितारे सर, श्री. कालीदासजी लाटा, श्री. आर. आर. शर्मा सर, श्री. कोलते सर, श्री. जुगलकिशोर मुखिया, सौ. सरोज डि. अग्रवाल, सौ. विद्या गोरख, श्री. श्यामराव पद्मने, श्री. श्रीकृष्ण सांबारे, उपप्राचार्य श्री. हेरंब दिगंबर यांचा शाल, श्रीफळ, हार व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शाळेत शिकून पुढे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी विद्यार्थी मा. आ. अँड. आकाशदादा फुंडकर, माजी नगराध्यक्ष श्री. गणेशभाऊ माने, नॅशनल एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रविणजी चोपडा, सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसचे अध्यक्ष श्री. सागरदादा फुंडकर, माजी प्राचार्य श्री. शा. ना. बोदडे, प्रसिध्द उद्योजक श्री. संतोष डिडवाणीया, माऊली इंजि. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव, सुप्रसिध्द शास्त्रीय गायीका कु. प्राजक्ता हसबनीस, योगपंडीत श्री. कल्याण गलांडे, प्रसिध्द उदयोजक श्री. विनोद हिडवाणीया, लेखा परिक्षक सीए मिना देशमुख, सेवानिवृत्त जिल्हा व सत्रन्यायाधिश मुंबई श्री. ओमप्रकाश भुतडा, पॉवरलिक इंजिनिअर्स नाशिक चे संचालक श्री. राजेश व्यास पुणे येथील प्रसिध्द उद्योजक श्री. अनिरुध्द वैद्य, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे आर्किटेक्ट श्री. कश्य तिडके व खेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. प्रेमतुषार इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेमध्ये एकाच कुटुंबातील सलग तीन पिढ्या शिक्षण घेणाऱ्या व शाळेच्या प्रती एकनिष्ठ अश श्री. वानखेडे परिवार, श्री. माळी व गोरख परिवार, श्री. सुळोकार परिवार व श्री डि. आर. कुळकण परिवार यांच्या कुटुंबियांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या मेळाव्यास मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व इतर स माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका या चर्चासत्रात आपत विचार मांडले व शाळेच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करण्याची इच्छा प्रकट केली. माजी प्राचार्य श्री शा.ना. बोदडे सर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या प्रगतीचा आढाव प्रस्तुत केला. यामध्ये संस्थापक सदस्य अॅड. श्री. महादेवराव चांदे, उद्योजक श्री. रायचंदजी मेहता प्रथम मुख्याध्यापक श्री. भगवानदासजी गुजराथी, श्री. रामचंद्रजी महाजन, डॉ. नागडा, अरजण खिमजी परिवार मुंबई व शाळेच्या स्थापनेपासूनचा माहिती नसलेला इतिहास सांगितला. संस्थेचे संचालक श्री दिनेशजी संघवी यांनी आपल्या भाषणात सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून स्थापन केलेल्या नॅशनल हायस्कूल अॅल्युमिनी असोसिएशन च्या या उपक्रमाची प्रशंसा केली व सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेसोबत संपर्क कायम ठेवावा ही भावना प्रकट केली.
आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांनी शाळेच्या उज्वल परंपरेची माहिती दिली व शैक्षणिक विश्वात संपूर्ण विदर्भात आपले वेगळे स्थान कायम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व माजी प्राचार्य व शिक्षकवृंदांचा उल्लेख व अभिनंदन केले. शाळेत शिकून जगभर विखुरलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अॅल्युमिनी असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येऊन शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
सायंकाळच्या सत्रात सर्व उपस्थितांसाठी पारिवारीक बहारदार संगित रजनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
या मेळाव्याचे बहारदार संचलन अॅड. अनिल व्यास व सौ. भाग्यश्री देशमुख तसेच आभार प्रदर्शन अॅल्युमिनी असोसिएशनचे सचिव श्री. विनोद डिडवाणीया यांनी केले. हा कार्यक्रम कु. मोनाली बळीराम वानखडे यांच्या प्रयत्नाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वदूर माजी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आला होता.
मेळाव्यास संस्थेचे संचालक, माजी प्राचार्य, सेवानिवृत्त शिक्षक, अॅल्युमिनी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व श्री. अनंत देशपांडे, श्री. रघुनाथ खेर्डे, श्री. गजानन वायचाळ, श्री. अनिकेत दावस्कर, श्री. तुषार आंबेकर, कु. रोशनी तायडे, श्री. अनिल वानखेडे, श्री. नितेश मानकर, श्री. बळीराम वानखडे, कु. मोनाली वानखडे व इतर माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. असे आयोजकांतर्फे एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
إرسال تعليق