सजनपुरीच्या नालायकाने चॉकलेटचे आमीष दाखवून ६ वर्षीय चिमुकलीचा केला लैंगीक छळ
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) युवकाने एका ६ वर्षीय चिमुकलीचा लैगिक छळ केल्याची घटना शहरालगत असलेल्या सजनपुरी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सजनपुरी येथील दिपक श्रीकृष्ण हेलोडे या नराधम युवकाने एका ६ वर्षीय चिमुकलीला २२ नोव्हेंबर रोजी चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून याच भागातील शाळेच्या बाथरुमध्ये नेले व त्याठिकाणी तिचा लैंगिक छळ केला. या घटनेने घाबरलेली पीडित चिमुकली शाळेतच रडत बसलेली होती. काहीवेळाने तिच्या आईने परिसरात मुलीचा शोध घेतला असता ती शाळेत रडत बसलेली दिसून आली. याबाबत तिला विचारणा केली असता तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली, मात्र बदनामीच्या भितीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. परंतु २५ नोव्हेंबर रोजी दृष्कृत्य करणाऱ्या दिपक हेलोडेने पीडित मुलीच्या घरी येवून तिच्या आई-वडिलांना धमकी दिली. यामुळे याबाबत पीडित मुलीच्या आईने शिवाजी नगर पोस्टेला तक्रार दिली असून यावरुन पोलिसांनी दिपक श्रीकृष्ण हेलोडे याच्याविरुध्द कलम ३६३,३६६ (अ) (एबी) ५०६ भादेवी, सहकलम ४,८,१२, लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
إرسال تعليق