खामगाव शहरामध्ये अवैध शिकवणीचा ऊत: शिक्षण विभागाच्या चिरीमिरी ची चर्चा

खामगांव शहरातील शाळे वरील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांची धमकी व चेतावनी देऊन त्यांचे घरी क्लासेस साठी जबरदस्ती करत असल्याचे आढळून आल्याने पालक व काही समाज संघटन हयांनी शिक्षण विभागामध्ये तशी तक्रार दिली आहे त्यामुळे अवैध शिकवणी घेणाऱ्या शाळेतील शिक्षकांवरती लगेच कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.


खामगाव शहरामध्ये शाळेवरील शिक्षक जोमाखोमात शिकवणी चालवत आहेत या बाबत शाळा व कॉलेजेस ला पात्र देऊन सूचित करण्याचे आश्वसनही शिक्षण विभाग खामगाव यांच्याकडून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून अशा धमकी व प्रेक्टिकलचे मार्क्स देणार नाही अशी चेतावणी व धमकीवजा इशारा देण्यात येत असेल तर अशा विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाकडे तशी तक्रार करावी, असे आवाहन काही समाजसेवी संघटना तथा पालकांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم