आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मधे दीपोत्सव उत्साहात साजरा
स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे दिवाळी निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. आदर्श ज्ञानपीठ येथे सर्वप्रथम महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री के. आर. राजपूत यांच्या हस्ते लक्ष्मीमाता, सरस्वतीमाता तसेच श्री गणेश यांच्या पूजन व आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य कविश्वर राजपूत, प्रियंका राजपूत यांच्या उपस्थितीत द्विपप्रज्वलन करुन दिवाळी महोत्सवाची सुरवात करण्यात आली.
दीपोत्सव कार्यक्रमात दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती सांगणारी पूजा, सजावट तसेच देखावे साजरे करण्यात आले होते. टीचर्स नी वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊभीज या दिवाळीच्या दिवसांना साजरे करण्याचे कारण आणि महत्व विद्यार्थ्यांना विविध देखाव्याच्या माध्यमातून समजून सांगितले. दीपोत्सवासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थी दीपोस्तवासाठी नवनवीन ड्रेस परिधान करुन शाळेत आले होते. विद्यार्थ्यांनी दीपोत्सवात दिवाळीचे दिवे रंगविणे, आकाश दिवे बनविणे तसेच त्यांची सजावट करणे अश्या विविध उपक्रमात भाग घेतला. दीपोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद पाहण्याजोगा होता. दीपोत्सवातील कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी घरी बनविलेला दिवाळी निमित्ताचा चिवडा, चकली इत्यादी आपापल्या वर्गमित्रांसोबत शेअर करत मोठया हर्षउत्साहात फस्त केला. दीपोत्सवाची सांगता फुलझड्या, फटाके फोडून तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका ममता महाजन, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, दामिनी चोपडे, प्रिया देशमुख, सारिका सरदेशमुख, प्रतीक्षा साबळे, संगीता इंगळे, प्रियंका वाडेकर, ऋतुजा गिरी, अश्विनी वक्ते, कोमल आकणकर, सपना हजारे,वंदना गावंडे, संगीता पिवळाटकर, सुवर्णा वळोदे, राजकन्या वडोदे, प्रतिभा गावंडे, लटके आदींनी प्रयत्न केले.
إرسال تعليق