खामगाव :- महर्षि वाल्मिकी कालिंका जगदंबा उत्सव मंडळ, सतीफैल, यांच्या वतीने माँ जगदंबा उत्सव निमित्त गोहर परिवार तर्फे 7नोव्हेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जलम नाक्यावरील न प शाळा क्रमांक 9 जवळील खेडकर हॉस्पिटल मध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सदर शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात मोफत मुळव्याध, भगंदर, गाठीचे व नेत्र तपासणी होणार आहे. सीबीरातील रुग्णांची तपासणी डॉ. आकाश खेडकर, डॉ. नितेश मेघवानी हे तज्ञ डॉक्टर करणार आहेत उल्लेखनीय म्हणजे दिनांक सात व आठ नोव्हेंबर रोजी शिबिराचाच एक भाग म्हणून 15 किलोमीटरच्या अंतरापर्यंत असणाऱ्या अत्यावश्यक रुग्णांसाठी श्री नवयुवक मानाची कावड यात्रा रुग्णवाहिका मोफत उपस्थित राहणार आहे. रुग्णवाहिकेसाठी विकी सारवान 83 85 13 01 27 किंव्हा शंकर संगेले 96 23 55 77 82 यांच्याशी संपर्क साधावा तर इच्छुक रुग्णांच्या नाव नोंदणीसाठी 91 46 93 96 10 किंवा 90 21 08 15 29 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Post a Comment

أحدث أقدم