जुडो, तायकांडो ,बॉक्सिंग ,कुस्ती खेळात महिला महाविद्यालय अव्वल स्थानी


 स्थानिक श्रीमती सुरज देवी रामचंद मोहता महिला महाविद्यालय खामगाव च्या विविध चमूंने नुकत्याच अमरावती  व अकोला येथे संपन्न झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन रेसलिंग, जुडो ,तायकांडो ,बॉक्सिंग   या विविध क्रीडा प्रकारात महाविद्यालयाच्या एकूण 19 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. अमरावती येथे संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत कु. स्नेहल विजय सिंग डाबेराव या पैलवान ने 65 किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल ची मानकरी ठरली. कु. भाग्यश्री संतोष खेडेकर हिने सुद्धा 68 किलो वजन गटात उपविजेता ठरवून सिल्वर मेडल ची मानकरी ठरली .अमरावती येथे संपन्न झालेल्या मार्शल आर्ट जुडो क्रीडा प्रकारात क. माधुरी संजय येऊलकर हिने 78 किलो हेवी वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल ची मानकरी ठरली. 63 किलो वजन गटात कु. स्नेहल विजयसिंह दाबेराव तृतीय क्रमांक मिळवून  ब्रांन्झ मेडलची मानकरी ठरली .तसेच अमरावती येथे संपन्न झालेल्या तायकांडो स्पर्धेत कु. स्नेहल विजय सिंग डाबेराव हिने 62 किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यावर मात करीत घवघवीत यश संपादन केले व विजयाची माळ आपल्याकडे खेचून गोल्ड मेडल ची मानकरी ठरवून दिलेल्या विद्यापीठ कलर कोटची दावेदार ठरली. नुकत्याच झुनझुनु राजस्थान येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ तायकांडो स्पर्धेत करीता विद्यापीठ संघात तिची निवड झाली होती.  अकोला येथे संपन्न झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत कु. श्रद्धा रोशन मुंग्यालकर हिने 48 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून ब्रांन्झ मेडलची मानकरी ठरली. कु. श्रुती शिवशंकर आटोळे 57 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळून ब्रांन्झ मेडलची मानकरी ठरली.कु. दिशा आठवले रुपेश आठवले ५४ किलो वजन गटात उपविजेता ठरवून सिल्वर मेडलची मानकरी ठरली. कु. स्नेहल विजय सिंग डाबेराव ६६ किलो वजन गटात उपविजेता घोषित करून सिल्वर मेडल ची मानकरी ठरली. कु. भाग्यश्री संतोष खेडकर उपविजेता घोषित करून 63 किलो वजन गटात सिल्वर मेडल ची मानकरी ठरली .कु. प्रतीक्षा शेषराव हिवाळे साठ किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळून ब्रांन्झ मेडलची मानकरी ठरली.75 किलो वजन गटात कु. प्रतीक्षा श्रीकृष्ण वानखेडे विजेता ठरून गोल्ड मेडल ची मानकरी ठरून विद्यापीठ कलर कोटची दावेदार ठरली. एकंदरीत विद्यार्थिनींचा यशाचा आलेख दिवसेंदिवस  वाढता बघता व विद्यापीठ  कलर कोट मानकरी त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री दिनेश काका संगवी श्री मनोज शेठ नागडा प्राचार्य डॉ. स्वाती चांदे ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व खेळाडूचे व संचालक खेळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रो. डॉ. सीमा देशमुख यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


Post a Comment

أحدث أقدم