उरळ येथील युवकाची खामगाव तालुक्यात आत्महत्या?
काळेगाव:-(अनिल मुंडे):- अकोला जिल्ह्यातील उरळ येथील प्रदीप वसंता पोरे या बावीस वर्षीय अविवाहित युवकाने खामगाव तालुक्यातील काळेगाव फाटा जवळी एका शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. प्रदीप हा कालपासून शिवारात फिरत होता. काही शेतकऱ्यांनी त्याला शेतातील केळे देखील दिली त्याच्याजवळ असलेली एम एच ३०-४३४६ क्रमांकाची दुचाकी घटनास्थळीच उभी होती
.या दुचाकीवरून युवकाच्या घरी संपर्क होऊ शकला. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रदीपचे प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळतात हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
إرسال تعليق