मोठ्या संख्येने पैहलवानांनी सहभागी व्हावे-विदर्भ केसरी पै.विजय बुच
खामगाव-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने होणार्या आगामी 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धासाठी बुलढाणा जिल्हातील निवड चाचणी 19 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे होत आहे या चाचणी मधे जिल्हयातील पैहलवानांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ केसरी पै.विजय बुच यांनी केले आहे. पुणे येथे प्रदिपदादा कंद यांच्या सोमेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने 4 ते9 नोव्हेंबर या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल, फुलगाव ता. हवेली, या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे त्याकरीता बुलडाणा जिल्हा तालीम संघाच्या वतीने गादी व माती गटातील पहेलवानांची निवड चाचणी वजन गट :- 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92. 97 व 86 ते 125 वजनी महाराष्ट्र केसरी गट यामध्ये होणार आहे. सदर निवड चाचणी खामगांव येथील श्री भगवान परशुराम नगर परिषद आखाडा या ठिकाणी 19 ऑक्टोंबर रोजी आयोजन केले आहे. सदर निवड चाचणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर तथा प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री आमदार डॉ.संजयकुटे व प्रमुख पाहुणे म्हणून खामगाव नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष मुन्ना पुरवार, उद्योजक संतोष डिडवाणी हे उपस्थित राहतील.तरी या जिल्हास्तरीय निवड चाचणीस जास्तीत-जास्त कुस्तीगीरांनी सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवावे. तसेच होऊ घातलेल्या राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेत बुलडाणा तालीम संघाच्यावतीने प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.विजय पांडुरंग बुच यांनी केले आहे.
إرسال تعليق