भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा


खामगांव:-  दस्तुर रतनजी ग्रंथालय च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्व प्रथम संस्थेचे अध्यक्ष  विठ्ठलराव लोखंडकार ,उपाध्यक्ष शशिकांत राजाराम भारंबे, सचिव अनंत रामचंद्र होणारे व ग्रंथालयाचे कर्मचारी सहग्रंथपाल मंगेश मधुकर बदरखे, रवींद्र शामराव खराटे यांनी माननीय ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

जाहिराीसाठी साठी संपर्क
8208819438

त्यानंतर सर्व ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल बाबुराव लोखंडकार यांनी केले. याप्रसंगी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी व त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल बाबुराव लोखंडकार व उपाध्यक्ष श्री शशिकांत राजाराम भारंबे यांनी आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी वाचकांचे व उपस्थित सभासदांचे संस्थेचे सचिव श्री अनंत रामचंद्र वनारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव  गजानन आखरे, संचालक वसंताभाऊ बेलोकार  राजेंद्र वानखेडे,  चंदन कौशल्य, श्री सचिन तांबट, श्री श्रीकांत वैद्य यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم