डॉक्टर सदानंद इंगळे यांच्या हॉस्पिटलमध्ये महिलेसह बाळाचा मृत्यू! हॉस्पिटल संतप्तच्या विळख्यात: पोलीस कुमक दाखल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: खामगाव येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सदानंद इंगळे यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या एका विशिष्ठ समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला असून महिलेसोबतच पोटातील बाळाचाही अंत झाला .
यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दवाखान्या भोवती रोष व्यक्त करीत विळखा घातला. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कुमक देखील घटनास्थळी दाखल झाली असून प्रकरणाला सावरा सावर करण्याचा प्रयत्न सुरू होता. वृत्त लिही पर्यंत घटने संदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त झाली नव्हती .मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी हजर होते. अधिक माहिती जाणून साठी डॉक्टर इंगळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
إرسال تعليق