खामगावात हे चाललंय तरी काय?
गर्दीच्या ठिकाणीही मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न!
खामगाव :-गजबजलेल्या ठिकाणी देखील मोबाईल चोर आता ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत असल्याने पोलीस डी ऍक्टिव्ह झाले की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय. आज दुपारच्या सुमारास स्थानिक आठवडी बाजारातील आयलानी यांच्या दुकानाजवळ बाबुराव बावणे यांच्या खिशातील मोबाईल तीन भामट्यांनी हिसकण्याचा प्रयत्न केला .मात्र खंबीर असलेल्या बावणे यांनी मोबाईल सोडला नाही. त्यामुळे चोरट्यांचे प्रयत्न झाले परंतु ,आठवडी बाजारात असलेल्या गजबजलेल्या ठिकाणी देखील चोरट्यांची एवढी मोठी हिम्मत पाहून पोलिसांचा धाक नसल्याचा आभास नागरिकांनी अनुभवला.
إرسال تعليق