आचरण हीच सर्वातमोठी श्रीमंती: निवृत्ती महाराज इंदुरीकर 


श्री खामगाव महोत्सव समितीच्यावतीने उद्या मंगळवारी श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी स्थानिक कलावंतांचा आर्केस्टा हाेईल.

खामगाव: खरी श्रीमंती ही पैशात नसून, आचरणात आहे. मात्र, अलिकडच्या काळात आम्ही शिवरायांनी सांगीतलेला स्वाभीमान विसरलो आहे. उच्च शिक्षितांची मुले वृध्दाश्रमात कष्टाचे जीवन जगत असल्याचे चित्र असतानाही शेतकरी खरा धर्म पाळत असल्याचे समाधान आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे केले.


स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर यावर्षी प्रथमच खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सायंकाळी सुप्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदादा मोहीते होते. उद्घाटक म्हणून  विशेष पोलीस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे, आ.ॲड. आकाश पॐुंडकर,  िजल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पेालीस अधिकारी विनोद ठाकरे, पाटील, अशोक लांडे, एएसपी महामुनी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने,  डॉ. वकारउल हक,  भाजप मिडीया सेलचे सागर पॐुंडकर, खामबाव अर्बन बॅकेचे आशीष चौबीसा, ओकंारआप्पा तोडकर, राजेश झापर्डे, संयोजक अमोल अंधारे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सोनल, पूनम, मिलाली पुरोहित यांनी गणेश वंदना सादर केली.   प्रास्ताविक ॲड. अमोल अंधारे यांनी केले. यावेळी यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. अशोक बावस्कर यांनी केले. आभार राजेश झापर्डे यांनी मानले.


Post a Comment

أحدث أقدم