बांधकाम कामगार कुटुंब आरोग्य तपासणी शिबिर
शेगाव :-- महाराष्ट्र राज्य सरकार व कामगार विभाग आयोजित महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना व त्यांच्या परिवाराला कुठले प्रकारचा आजार होऊ नये तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता वर्षातून एकदा बांधकाम कामगार कुटुंब आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले आहे
स्थानिक सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिनांक 13 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगार कुटुंब आरोग्य तपासणी शिबिर सुरू असून या शिबिरा सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अवश्य फायदा घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी हे आरोग्य तपासणी मोफत असून काही आजार असल्यास त्याच्या खर्च सुद्धा मंडळातर्फे करण्यात येईल अशी माहिती व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या शिबिराचा फायदा लाभ घ्यावा असे आव्हान शिबिराचे समन्वयक उमेश शिरसाठ यांनी केले. या शिबिराकरिता प्रथमेश बोंद्रे मयूर इंगळे अमोल धारसकर वैभव काळबांडे व परमेश्वर वरखडे यांनी बांधकाम कामगारांची व कुटुंबांची तपासणी केली.
إرسال تعليق