महिला महाविद्यालयात जागतिक क्रीडा दिन साजरा 



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-स्थानिक श्रीमती सुरजदेवी रामचद मोहता महिला महाविद्यालयात  खेळ व शारीरिक शिक्षण विभागातर्फे  हॉकीचे जादूगर  मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस जागतिक क्रीडा दिन म्हणून साजरा करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती चांदे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. खेळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ.सीमा देशमुख यांनी मेजर हेध्यानचंद यांच्या जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकताना जगातील हॉकी खेळाचे अग्रगण्य खेळाडू म्हणून ख्याती  प्राप्त मेजर ध्यानचंद यांची मेहनत, संघर्ष, जिद्द व  देशाप्रती  व राष्ट्राप्रती अभिमान व त्यांचे हॉकी खेळातील योगदान , त्या काळातील सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल खरंच वाखाणण्याजोगी आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व देशभरात खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा व उदयनमुख खेळाडूंनी त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपली यशाच्या  दिशेने वाटचाल करावी हाच खरा हेतू आजच्या कार्यक्रमाचा आहे.या निमित्ताने विविध खेळ स्पर्धांचे तसेच सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाचे आयोजन या सप्ताहात करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم