आझादी का अमॄत महोत्सव व स्वातंत्र्य दिना निमित्त तसेच "मेरी माटी मेरा देश - मिट्टी को नमन, वीरों को वंदन" उपक्रमा अंतर्गत अपना घर सामाजिक सेवाभावी संस्था व शनिदेव ट्रस्ट आणि येरवडा खुले कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती वर आधारीत गीत गायन सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बंदयांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे आणि त्यांच्या मध्ये देशभक्ती पर भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अपना घर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने भिक्षा मागणारे, अंध-अपंग व्यक्ती साठी तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मदत केली जाते तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाते.
तसेच समाजातील दुर्लक्षित घटक बंदी बांधवांसाठी ही विविध उपक्रम व कार्यक्रम अपना घर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात. सदर कार्यक्रमामध्ये नामांकित गायकांनी देशभक्ती वर आधारीत विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बंदयांनी ही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्ती वर आधारीत गीते सादर केली..
सदर कार्यक्रमा करिता अपना घर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रणिता राठी, श्रध्दा राठी, मंदार दानवले, शनिदेव ट्रस्ट चे संस्थापक नयन पुजारी, कुणाल पवार, संतोष भोसले, प्रशांत मोरे तसेच अधीक्षक अनिल खामकर किरण ओसवाल पूजा ओसवाल टिंच म्युझिक ग्रुप ( हम साथ साथ है ) ह्यनी कार्यक्रमाची शोभा वडवली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق