भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी खामगावात
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- आगामी निवडणुकांसाठी भाजपने 'महाविजय २०२४' संकल्पाची घोषणा केली आहे. भाजपाने येणाऱ्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेसाठी 'मिशन ४५', तर विधानसभेसाठी 'मिशन २००' जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात विशेष सभा, कार्यकर्ते शिबिरे, मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत शनिवार २ सप्टेंबर रोजी खामगावात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संपर्क से समर्थन, घर घर चलो अभियान,,,, यासाठी येत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या 'महाविजय २०२४' अंतर्गत संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने हे कार्यक्रम पार पडणार आहे. या अंतर्गत संपर्क से समर्थन, घर घर चलो अभियान या कार्यक्रमासाठी खामगाव शहरात भारतीय जनता पार्टी कडून विविध कार्यक्रमासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत
إرسال تعليق