लॉन टेनिस स्पर्धेत जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांची विभागास्तरावर निवड
खामगाव- नुकतेच खामगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर कॉलेज आवारच्या दोन विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून विजय मिळविल्याने त्यांची विभागा स्तरावर निवड झाली आहे.
![]() |
Advt. |
परिजा अकॅडमी खामगाव येथे 18 ऑगस्ट सत्र 2023- 24 च्या अंडर 17 लॉन टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेज आवारचे विद्यार्थी मंथन जैन व आदित्य विजय चिमकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय मिळविला. यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर होणाऱ्या लॉन टेनिस स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर कॉलेज आवारचे नाव उंचावल्या गेले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने संस्थेच्या सचिव प्रा. सुरेखा गुंजकर व प्राचार्य सतिष रायबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी... विवेक ब्राह्मणे सर विशाल घोडके सर जाट सर संदीप सातपुते सर.... आदिंची उपस्थिती होती.
إرسال تعليق