बोथाकाजी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश हिवराळे यांची निवड
खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोथाकाजी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी योगेश रमेश हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे सभा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी योगेश हिवराळे यांची तर उपाध्यक्षपदी ईश्वर घटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्यांमध्ये गोपाल भगत, नाना खरात,दुर्गा दत्तू हिरेकर, रेखा अमोल हिवराळे, अमरदीप हिवराळे, विकास हिवराळे, वासुदेव हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सारंगधर तायडे शिक्षक संदीप झोडपे व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. I फोटो - योगेश हिवराळे, ईश्वर घटे
إرسال تعليق