स्काऊटर गाईडर मार्गदर्शन सभा संपन्न
शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक व बुलढाणा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव येथे शेगाव व खामगाव तालुक्यातील शिक्षकांकरिता एकदिवसीय स्काऊट गाईड उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले. या उजळणी वर्गाची सुरुवात स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व स्काऊट गाईड प्रार्थना आणि करण्यात आली, *उजळणी वर्गात स्काऊट गाईड चा इतिहास, युनिट नोंदणी, अभ्यासक्रम, संघनायक शिबिर, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, वार्षिक नियोजन, समुदाय विकास कार्यक्रम व सेवा प्रकल्प, शालेय स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे उपक्रम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उजळणी वर्गाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी आर. उपरवट, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री आर यु शिंगणे, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती डॉ.निर्मला जाधव, जिल्हा संघटक स्काऊट श्री एस पी आठवले, जिल्हा संघटक गाईड श्रीमती कविता पवार यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले*. *श्रीमती यास्मिन बानो यांनी कृतीयुक्त गीत गायले.श्रीमती निर्मला जाधव यांनी स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरी पाली राजस्थान येथील अनुभव शिक्षकांना सांगितले या उजळणी वर्गामध्ये शेगाव व खामगाव तालुक्यातील 55 शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी साठी *श्री प्रवीण बागडे यांनी परिश्रम घेतले. टिळक राष्ट्रीय विद्यालय येथील मुख्याध्यापक श्री पातूर्डे सर यांनी मोलाचे सहकार्य केले*
إرسال تعليق