अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्ट कडून आयोजित महा-आरोग्य जीवनदायी शिबिर
खामगाव:- सुख-दुःखात माणुसकीची किनार निर्माण करीत आपल्या कार्यातून संपूर्ण राज्यभरात "नातं माणुसकीचं" जपणाऱ्या तसेच आरोग्य व शिक्षण सेवेचा वसा लाभलेल्या अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्टचे उत्तरदायित्व म्हणजे निःपक्ष समाजसेवा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील अस्तित्व परिवार हे समाजसेवेचं व्यासपीठ तसेच मायेचा सागर बनलं आहे.
एकंदरीतच गरजू, रंजल्या-गांजल्या ,गोरगरीबांना सेवा मिळावी या उदात्त सेवभावणेतून अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.आकाश वासुदेव इंगळे यांच्या अमूल्य सहकार्याने भारतीय स्वतंत्रता दिवस आणि प्रिय प्रणित दिलीप इंगळे म्हणजेच आमचा लाडका येंजल याच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य जीवनदायी शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून उच्च विभूषित, तज्ञ, अनुभवी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ विभाग प्रमुखांचे या महा आरोग्य जीवनदायी शिबिरात तपासणी,उपचार व मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये प्रामुख्याने, K.E.M.मुंबई, जे.जे. हॉस्पिटल मुंबई,टाटा मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल मुंबई, जी.टी.हॉस्पिटल मुंबई, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, वर्धा,छत्रपती संभाजी नगर , अकोला, बुलढाणा,मलकापूर,चिखली,शेगाव व खामगांव इत्यादी ठिकाणचे उच्च शिक्षित नामवंत डॉक्टर्स एक दिवसीय रुग्णसेवा देऊन नातं माणुसकीचं जपणार आहेत.
यामध्ये प्रमुख्याने प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज बनोदे ,डॉ.विवेक लांजे, डॉ.जवाहर राठोड,डॉ. साजल बंसल (नागपूर) डॉ.प्रवीण चाबुकस्वार,(संभाजी नगर) तर अस्थिरोग तज्ञ मधून डॉ.रत्नाकर अंबोडे (वर्धा),डॉ.अतुल वानेरे (बुलढाणा), डॉ.नरेंद्र सिंग पवार (खामगांव), डॉ.अच्युत फिरके, डॉ.राहुल चोपडे,डॉ.मानव पाटील (मलकापूर), प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ.विशाल वाठोरे (छत्रपती संभाजी नगर), डॉ.नावेद देशमुख (खामगाव), प्रसिध्द चेस्ट मेडीसिन डॉ.चाबुकस्वार (छत्रपती संभाजी नगर), कर्करोग तज्ञ डॉ.तुषार मुळे (छत्रपती संभाजी नगर), प्रसिध्द किडनी तज्ञ डॉ.अमर सुलतान, (अकोला),प्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ.दिपाली मामनकर ,(अकोला) प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ.वैष्णवी आदित्य (अमरावती) डॉ.गौरव राठोड (खामगाव) प्रसिध्द जनरल मेदिडीन तज्ञ डॉ.चेतन इंगळे (मुंबई), डॉ.राहुल खंडारे (खामगाव),डॉ.विजय सोळंकी (बुलढाणा), प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ.पूजा वाठोरे (संभाजी नगर) डॉ.प्रशांत ठेंग (खामगाव) डॉ.मोहिनी सोळंकी (बुलढाणा) प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ.विकास चारखे ,डॉ. प्रियंका ठेंग (खामगाव),डॉ.वैभव पांचाळ डॉ.प्रदीप खार्डे (बुलढाणा) प्रसिध्द दंतरोग तज्ञ डॉ.अंतिम मगर, डॉ.निखिल खंडारे (खामगाव), प्रसिध्द स्किन तज्ञ डॉ.तुषार गोंधने (चिखली), प्रसिध्द श्रवण व वाचा तज्ञ डॉ.प्रकाश जगताप (खामगांव).प्रसिध्द समाजसेवा विभाग तज्ञ डॉ.प्रकाश गायकवाड (मुंबई),प्रसिध्द कान,नाक,घसा तज्ञ डॉ.जयंत सोनुने (खामगांव) इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे.
*तपासणीचे प्रमुख विभाग*
या महाआरोग्य जीवनदायी शिबिरामध्ये हृदयरोग विभाग, मधुमेह, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, कर्करोग विभाग ,किडनी विभाग, मानसोपचार विभाग,वंध्यत्व निवारण विभाग (महिलांना मुल बाळ न होणे), स्त्रीरोग विभाग , बालरोग विभाग, नेत्र विभाग,अस्थिरोग विभाग,दंतरोग विभाग, स्किन विभाग,श्रावण व वाचा विभाग, कान नाक घसा इत्यादी विभागांचे तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स उपलब्ध राहतील...
रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने या महाआरोग्य जीवनदायी शिबिराचा लाभ घ्यावा. रुग्णांनी येताना मागील तपासणी रिपोर्ट सोबत घेऊन यावे. नाव नोंदणी निःशुल्क असेल. नाव नोंदणीसाठी रुग्णांनी स्वतः हजार राहावे.
नाव नोंदणी साठी वेळ सकाळी 09.30 ते 11 पर्यंत राहील
إرسال تعليق