खामगावात कासार समाजाचे निवेदन

 .... अन्यथा कासार समाज स्वस्थ़ बसणार नाही-  सौ.हेमा आमले, जिल्हा उपाध्यक्ष कासार समाज

 त्याच्या मालमत्तेवर बुलडोजर चालवा – जितेंद्र कुयरे, सचीव, खामगांव कासार समाज 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- निवघा ता.मुदखेड जि.नांदेड येथील अल्पवयीन विद्यार्थीनीला गावगुंड ज्ञानेश्वऱ ऊर्फ सोन्या पवार याने सतत छेडछाड करुन त्रास दिल्यामुळे तिला जीव गमवावा लागला.  यामुळे निवघा येथील केवळ कासार समाजच नव्हे तस सर्व मुलींच्या पालकांना मुलींच्या सुरक्षेचा प्रश्ऩ निर्माण झाला आहे. याबाबत आज खामगांव सोमवंशीय कासार समाज मंडळातर्फे मा.ना श्री देवंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, यांना मा.उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आरोपीवर पोस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.


यावेळी बोलतांना बुलढाणा जिल्हा कासार समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.हेमा अनिल आमले, या म्हणाल्या की, निवघा ता.मुदखेड जि.नांदेड येथील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई केल्या शिवाय समस्त़ कासार समाज स्वस्थ़ बसणार नाही.  येत्या काळात आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल.  

तसेच यावेळी बोलतांना खामगांव कासार समाजाचे सचीव जितेंद्र कुयरे म्हणाले की, एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीस महाविद्यालयात येता जाता त्रास देणारा गांवगुड ज्ञानेश्व़र ऊर्फ सोन्या पवार याच्या सततच्या छळाला कंटाळून शेवटी तिला जीव गमवावा लागला. या महाविद्यालयात येणाऱ्या केवळ या पिडीत विद्यार्थीनीसच त्रास नव्हता तर या गावातील अनेक विद्यार्थींनींना देखील त्रास होता.  त्यांना पालक शाळेत सोडायला व घ्यायला येत असत.  या गावगुंडामुळे या गावात भितीचे वातावरण असून यामुळे विद्यार्थींनींना महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.  अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या मालमत्तेवर बुलडोजर चालवावे म्हणजे त्यांना कायमची अददल घडेल आणि अशा गुंड प्रवृत्ती पुन्हा जन्माला येणार नाहीत.


यावेळी खामगांव कासार समाजाचे अध्यक्ष वासुदेव आमले यांच्या नेतृत्वात श्री अनिल विष्णुपंत रंगभाल उपाध्यक्ष,श्री जितेंद्र अशोकराव कुयरे  सचीव, श्री चंद्रकांतसेठ डिगंबरसेठ आमले  जिल्हा उपाध्यक्ष,बुलढाणा,सौ हेमा अनिल आमले  जिल्हा उपाध्यक्ष महिला बुलढाणा , सौ.रुपाली संजय वाघ अध्यक्ष खामगांव कासार समाज, श्री नंदकिंशोर व्यंकटेश तांबट,  श्री विनायक जगन्नाथ तांबट, श्री सुनिल रामभाऊ आमले, श्री सचीन गोविंदराव वऱ्हाडे,  श्री  योगेश दिलीपराव मैंद, श्री गिरीष सुरेंद्र मैंद, श्री मोहन यशवंत बारस्क़र, श्री अनिल सुर्यकांतशेठ सातपुते, श्री प्रदीप वसंतराव माहुरकर, श्री किरण सुधाकर मुळे, श्रीमती कुसूमबाई हेलकर, सौ.विद्या विनायक तांबट, सौ. तनुजा नितीन धोपटे, सौ.नदिनी सुनील आमले,  सौ ज्योत्स्ना जितेंद्र कुयरे, सौ अनुपमा अनिल कानडे, सौ अंजू संजय मैंद, सौ रुपाली योगेश मैंद,  सौ कल्पना शैलेश तांबट, श्रीमती जयश्री प्रकाश कोमटे कोषाध्यक्षा, सौ  बेला तांबट उपाध्यक्षा, सौ संगिता माहुरकर, सौ मनीषा इसोलिकर, सौ.पुजा सचीन वऱ्हाडे, सौ कल्पना तांबट, सौ वर्षा मैंद, सौ अस्मीता अनिल रंगभाल, सौ संध्या किरण मुळे, सौ जयश्री दोडे, श्री देवेंद्र बबनराव दगडे, श्री विशाल वसंतराव पांढरकर, श्री अनिल ब.कानडे, श्री अजय श्रीराम इसोलीकर, श्री मिलींद श्रीराम इसोलीकर, श्री अशोक गो.मैंद, श्री प्रविण कृष्णराव दोडे, सौ.संगिता दगडे, श्री यश वासुदेव आमले, सौ अनिला धोपटे, श्री विजय अंबादास बारस्कर, श्री दत्तात्रय डिगंबर आमले, श्री अनिल रामभाऊ कोमटे, श्री संजय वाघ, , श्री रविंद्र हेलकर, श्री आयुष संजय कोमटे, श्री नितीन जनार्दन धोपटे, सौ मंगला राजेंद्र धोपटे, श्री मोहनसेठ बारस्क़र, सौ मिनल पांढरकर, श्री राजुसेठ शांताराम धोपटे, सौ जयश्री प्रफुल पांढरकर, सौ अंजली  तांबट, सौ प्रचिती तांबट, श्री संजय कोमटे, श्री परिमल किरण मुळे, कु.संस्कृती जितेंद्र कुयरे, यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

Post a Comment

أحدث أقدم