श्रींच्या पालखीचे खामगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केले स्वागत 


खामगाव प्रतिनिधी: पंढरपूर येथून परतीच्या प्रवासात असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव शहरात आगमन होऊन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पायी वारीत हजारो भक्तगण सहभागी झाले होते.स्वगृही परतणाऱ्या पालखीचे मेनरोड पालखीचे आगमन होताच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे व पदाधिकाऱ्यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून स्वागत करत मनोभावे दर्शन        घेतले.


यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव,रमेश गवारगुरु, अमित फुलारे,प्रल्हाद तराळे, करण छापरवाल, गगन वानखडे,संदेश अवसरमोल, अमोल चौकसे, सुमित छापरवाल, संतोष चौकसे, विशाल तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेl फोटो -

Post a Comment

أحدث أقدم