सायकल द्वारे वैष्णोदेवी, अमरनाथ ,हरिद्वार जाणाऱ्या भाविकांचे फारशी मित्र मंडळातर्फे स्वागत
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वैष्णोदेवी अमरनाथ यात्रेकरिता दि.४जुलाई रोजी ११ भाविक सायकलद्वारे रवाना झाले,यामध्ये अनिल सदाशिव मीटकरी,विनोद वसंतराव चोपडे,गजानन तुलसीराम जांम्भे,योगेश प्रविण रेड्डी,विष्णु जगन्नाथ ठाकूर शेंगाव,राजू अरुण जैस्वाल,नीलेश आत्माराम गवई,विशाल राम सपकाळ,अर्जुन छोटेलाल गोडाले,विष्णु अर्जुन मीरगे,सचिन गणेश अप्पा शेंबेराव यांचा समावेश आहे, खामगाव येथून दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने भाविक सायकल द्वारे या यात्रेकरिता जात असतात, जवळपास २२०० किलोमीटरचा सायकल द्वारे अति दुर्गम प्रवास करीत दररोज शंभर किलोमीटरच्या जवळपास सायकल वर प्रवास करून हरिद्वार मार्गे, प्रवासादरम्यान मार्गात येणाऱ्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेत, हे भाविक दि.२७ जुलै च्या आसपास कटरा येथे दाखल होणार आहे। व तेथून मा वैष्णोदेवी व बाबा अमरनाथ यांच्या दर्शनाकरिता रवाना होणार आहेत, या यात्रेदरम्यान ठीक ठिकाणी या भाविकांचा स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव होत असतो। जोहारले नगर जवळील हनुमान मंदिर येथे या भाविकांनी पांडुरंग काका भालेराव यांच्या उपस्थितीत हनुमंताची विधीवत पूजन व आरती केली, यावेळी फरशी मित्र मंडळातर्फे रवि जोशी,निखील वानखेडे,शुभम पालीवाल,सोनू खत्री प्रफुल्ल थारकर,नितेश खरात,पंकज शर्मा,यांच्या हस्ते भाविकांचा पुष्पहार घालून व पेढा भरून तसेच पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देउन सत्कार करण्यात आले,व सर्वांना वेदनानाशक चे वितरण करण्यात आले,मागील दोन दशकापासून फरशी मित्र मंडळातर्फे भाविकांच्या स्वागताची हि परंपरा असून,ती आज पावेतो जोपासल्या जात आहे।
إرسال تعليق