जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव

 रोटरी क्लब खामगांवच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आयोजित

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रोटरी इंटरनॅशनल ही एक जागतिक संस्था असून हिची व्याप्ती जगातील २०० हुन अधिक देशांमध्ये आहे. भारतातदेखील या संस्थेचे कार्य शहरी आणि ग्रामीण या दोन्ही स्तरांवर खूप जोमाने चालते. या संस्थेला कुठलीही शासकीय मदत मिळत नाही. सर्व कार्याचे खर्च सदस्यांनी जमा केलेल्या सदस्यता शुल्काद्वारे भागविल्या जाते.



आपल्या कार्यामुळे एका छोट्याश्या गांवातील रोटरी क्लब खामगांव ही एक नावाजलेली संस्था म्हणून देशभर ओळखली जाते. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबीर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, डोळ्यांचे शस्त्रक्रिया शिबीर, त्वचारोग तपासणी शिबीर, गर्भसंस्कार शिबीर, माटी के गणेश, मॅराथॉन , सायक्लोथॉन, शिलाई मशीन प्रशिक्षण व वाटप, आय क्लीन खामगांव, कवी संमेलन, हॅपी  स्ट्रीट, व्यक्तिमत्व विकास शिबीर, पर्यावरणपूरक शवदाहिनी,  जलकुंभ, गतिमंद विद्यालय, रोटरी स्कुल, ऑर्थोपेडिक बँक, इ लर्निंग सेट्सचे वाटप, गणवेश वाटप अशा अनेक प्रोजेक्ट्सद्वारे रोटरी क्लब खामगांव आपले कार्य जोमाने करत असते.


यावर्षी याच कार्यांना समोर नेण्यासाठी आणि अजून काही कल्पक प्रकल्पांची यादी वाढविण्याच्या उद्देशाने वर्ष २०२३-२४ साठी रोटरी क्लब खामगांवच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ येत्या रविवारी म्हणजेच ९ जुलै २०२३ रोजी स्थानिक अग्रसेन भवन मध्ये सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती रो सुरेश पारिक हे अध्यक्ष म्हणून तर रो आनंद शर्मा हे मानद सचिव म्हणून आणि रो प्रसाद अग्रवाल हे कोषाध्यक्ष म्हणून रोटरी वर्ष २०२३-२४ साठी कार्यभार स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध वक्ते रोटरी डिस्ट्रीक्ट  ३१३१ चे पूर्व प्रांतपाल रो मोहन पालेशा (पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तर रोटरी डिस्ट्रीक्ट  ३०३० चे पूर्व प्रांतपाल रो डॉ आनंद झुंझुनूवाला यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रोटरी क्लब खामगांवचा गौरवशाली वसा पुढे घेऊन जाण्याचा किंबहुना त्यात अजून भर घालण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष रो सुरेश पारिक आणि मानद सचिव रो आनंद शर्मा यांनी व्यक्त केलेला आहे. मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर (जलम्ब व  माटरगांव) आणि अग्रसेन भवन खामगांव येथे आयोजित  रक्तदान शिबिराद्वारे वर्षांची धडाकेबाज सुरुवात करण्यात आलेली आहे, तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा असे सूत्रांनी कळविलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم