इमर्जन्सी अलर्ट असा मेसेज तुम्हालाही आला काय?


खामगाव :- आज, २०जुलैच्या सकाळी १०वाजेच्या सुमारास अनेकांचे मोबाईल खणखणत होते. मोबाईलवरइमर्जन्सी अलर्ट असा मॅसेज येत होता. नेमक काय होत आहे हे कळत नव्हत... मनात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. विविध शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे हा प्रकार जाणून घेण्यासाठी जनोपचार द रियल न्यूज ने  प्रयत्न केला. अखेर विविध सोर्स आणि सायबर पोलिसांशी बोलून  नेमका प्रकार शोधून काढला आहे.


 हा प्रकार आमच्यासाठी देखील नवीन आहे, आम्ही भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाशी संपर्क साधून याबाबत विचारणा करतआहोत असे सायबर पोलिसांनी सांगितले. सायबर पोलिसांचा दुरसंचार मंत्रालयाशी संपर्कनंतर  यातील खरे कारण समोर आले. दूरसंचार मंत्रालयाने देशभरात २० ठिकाणी आणि आसपासच्या भागात एक ड्राईव्ह टेस्ट केली. व्हॉइस आणि डेटा सेवांसाठी मोबाईलटेलिफोन कंपन्याद्वारे देण्यात येणाऱ्या गुणवत्तेची चाचणीया ड्राईव्ह टेस्ट द्वारे करण्यात आल्याचे भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم