गुन्हेगारांना सोडणार नाही -sdpo ठाकरे
खामगाव उपविभागात झालेल्या चोर्यांच्या घटना उघडकीस आणून पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळविली आहे.उघडकीस आणलेल्या गुन्ह्याबाबत sdpo ठाकरे यांनी आज खामगाव येथे पत्रकार परीषद घेऊन पत्रकारांसमोर लेखाजोखा ठेवला
• सोन्या चांदीचे दुकाणातुन चोरी करणारा जेरबंद
दिनांक 13/06/2023 रोजी दुपारी 02.00 वा सुमारास कस्तुरचंद त्रंबकदास ज्वेलर्स मेनरोडखामगाव येथील दुकाणातुन एक सोन्याचा करडुचा जोड किमती 10000/-रु व 3 जोड चांदीचे जोडवेकिमती 5500/-रु असा एकुण 15500/-रु चा माल अज्ञात चोरटयाने चोरुन नेले वरुन पोस्टेला अपन295/2023 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल करुन तपासात घेण्यात आला.सदर गुन्हयाचे तपासात डीबी पथक खामगाव शहर यांनी गोपणीय माहीतीच्या आधारे आरोपीनामे विठठल भालचंद्र सानप, वय 52 वर्ष, रा. राजुगांधी नगर सिडको औरंगाबाद यास दिनांक16/06/2023 रोजी अटक करुन त्याचे ताब्यातुन एक सोन्याचा करडुचा जोड किमती 10000/-रु व 3जोड चांदीचे जोडवे किमती 5500/-रु असा एकुण 15500/-रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
बसस्थानक खामगाव येथे मोबाईल चोरी करणारी महीला जेरबंद
दिनांक 20/06/2023 रोजी सौ.काजल सुनिल म्हैसने वय 23 वर्ष, रा. देशमुख प्लॉट खामगावहयांनी पोस्टेला रिपोर्ट दिला की, त्यांची बहीण नामे कु.कोमल हिला अकोला येथे जाण्यासाठीबसस्थानक येथे सोडण्यासाठी आली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने तिचा औप्पो A17 कंपनीचाजुना वापरता मोबाईल कि.अ.10,000/-रु तसेच आकाश काशीराम मुधोडकर रा.उकळी सुकळीता. मेहकर याचा vivo Y 21 कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि.अ.10,000/-रु असा एकुण20,000/-रु चे मोबाईल अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबत पोस्टे ला अप नं 314/2023 कलम 379भा.द.वि प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तपासात डीबी पथक खामगाव शहर यांनी गोपणीय माहीतीच्या आधारेआरोपी नामे पदमा व्यंकटेश अमलु वय 30 वर्ष रा. गांधीनगर तांदुर जि. हैदराबाद राज्य तेलंगणा हिसदिनांक 20/06/2023 रोजी रेल्वेस्टेशन परीसरातुन अटक करुन तिचे ताब्यातुन चोरी गेलेले 1) औप्पोA17 कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि.अ.10,000/-रु तसेच 2) vivo Y 21 कंपनीचा जुनावापरता मोबाईल कि.अ.10,000/-रु असा एकुण 20,000/-रु चे मोबाईल वरील नमुद प्रमाणेमुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
● शाळा क्र 7 बाळापुर फैल खामगांव येथील शाळेत चोरी करणारे आरोपी जेलबंद
दिनांक 16/06/2023 रोजी फिर्यादी प्रमोद अर्जुन तिडके वय 51 वर्ष रा.गजानन कॉलनी खामगांवयांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की दिनांक 14/06/2023 चे 12.30 ते दिनांक 15/06/2023 चे 09.00वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने शाळेतील दोन क्विंटल तांदुळ कि.4000/-रु, सिलींग फॅन5 नग कि. 4000/-रु, टुब लाईट 6 नग कि.240/-रु असा एकुण 8,2,40/-रु मुद्देमाल कोणीतरी अचोरटयाने चारुन नेले वरुन पोस्टे खामगांव शहर येथे अप नं 300/2023 कलम 454,457,380भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तपासात डीबी पथक खामगाव शहर यांनी गोपणीय माहीतीच्या आधारेआरोपी नामे 1 शिवा कैलास इटे वय 20 वर्ष,2. महादेव गणेश डोंगरे वय 22 वर्ष दोन्ही राबाळापुर फैल खामगांव यांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन दोन क्विटल तांदुळ कि.4000/-रु,सिलींग फॅन 5 नग कि.4000/-रु, टुब लाईट 6 नग कि. 240/-रु असा एकुण 8,2,40/-रु मुद्देमालहस्तगत करण्यात आला आहे.
मार्केट मधील व्यापाऱ्याची पैश्यांची बॅग चोरी करणारा ताब्यात
दिनांक 24/06/2023 रोजी फिर्यादी संजय हरीभाऊ वानखेडे वय 53 वर्ष रा. सुटाळपुरा खामगांवयांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की ते धान्य मार्केट खामगांव येथील अडत दुकानात बसलेलेअसतांना त्याचे जवळची पैश्यांची पिशवी ज्यामध्ये 21,400/-रु ची कोणीतरी अज्ञात इसमाने चोरीकेली अशा रिपोर्ट वरुन अप नं. 324/2023 कलम 379 भा द वि प्रमाणे नोंद आहे.सदर गुन्हयाचे तपासात डि बी पथक खामगांव यांनी एक 15 वर्षाचा विधीसंघर्ष ग्रस्तबालकक रा.वाकीपाडा ता.नवापुर जि. नंदुरबार यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 21,400/-रुअसलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर वि.स.बा याने दिनांक 21/06/2023 रोजीआठवडी बाजार खामगांव येथे सुध्दा 28042/-रु /-रु चोरी केल्याची कबुली दिली असुन अप नं317/2023 कलम 379 भादवि गुन्हा उघडकीस आला आहे.सदर कार्यवाही सुनिल कडासने पोलीस अधीक्षक.बुलढाणा, अशोक थोरातअपर पोलीस अधीक्षक .बिबी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा खामगाव विनोद ठाकरे उपविभागीय पोलीस अधिकारी सा खामगांव, यांचे मार्गदर्शनात पो नि शांतीकुमार पाटील पोलीस निरीक्षक पोस्टे खामगांव शहर, सपोनि संदीप गोंडाने, पोना प्रदीपमोठे, सागर भगत, पो.कॉ रविंद्र कन्नर, गणेश कोल्हे, राम धामोडे, अमरदिपसिंह ठाकुर, अंकुशगुरुदेव, राहुल थारकर, आशीषसिंह ठाकुर यांनी केली आहे.
إرسال تعليق