युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये "आषाढी एकादशी" निमित्त विठुरायाची पालखी व दिंडी सोहळा


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुराया यांचा भक्ती सोहळा युगधर्म पब्लिकस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सरस्वती वंदना, गणपती पूजन व विठुरायाच्या आरतीनेकार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यासाठी युगधर्म पब्लिक स्कूलचे संचालक  गोपाल अग्रवाल, शाळेचे सचिव  मधुर अग्रवाल उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप सपकाळसर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विठुराया आणि त्यांचे वारकरी यांच्यामधील अतूट नातं, प्रेम याबद्दलविद्यार्थ्यांना माहिती दिली. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता देशमुख  यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. विजया आखरे  यांनी केले.


विठुराया आणि आषाढी एकादशीचे महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे या उद्देशाने आजयुगधर्म पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असेअनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आली. चिमुकल्यांनी विठूनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभागनोंदविला. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा माऊली च्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. या

सोहळ्यामध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवातज्ञानोबाच्या कीर्तनाने करण्यात आली. वेगवेगळ्या अभंगावर चिमुकल्यांनी ताल धरला होता तसेच शिक्षकवृंदा ने फर धरून व फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.

या सोहळ्यासाठी देवांश अनासने, सोहम तारडे, शिवराज शेळके हे विद्यार्थी विठ्ठलाच्या तर शिवण्याकेसकर, स्वरा पवार, सान्वी गूप्ता, आरोही ठोबरे, सेजल पडोळे ह्या विद्यार्थ्यांनी रखुमाईच्या वेशभूषेत होत्या.


सोबतच आर्यन अनासने वीणाधारी बनला होता. तर काही विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातामध्ये भगवा झेंडाघेऊन तसेच विद्यार्थिनी आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा

सोहळा पाहण्यासाठी पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री

संदीप सपकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. धनश्री देशमुख, सौ. विजया आखरे मॅडम, भाग्यश्री धोरन मॅडम,

क्रिडा शिक्षक कुशल सेवक सर, सचिन राठोड सर, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या विठूनामाच्या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم