*आद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू*
खामगाव,दि.३०(उमाका)
प्रवेशसत्र ऑगष्ट-२०२३ ची प्रत्यक्ष प्रवेश अर्ज निश्चिती करणाबाबतची कार्यवाही दिनांक. १९/०६/२०२३ पासुन सुरु झालेली आहे ज्या उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा सर्व उमेदवारांनी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (I.T.I.) मध्ये मुळ कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहुन प्रवेशासाठी भरलेला ऑनलाईन अर्ज कन्फर्म करुन घ्यावा. अर्ज कन्फर्म केल्याशिवाय प्रवेशासाठी व्यवसायाचा विकल्प निवडता येणार नाही याबाबतची माहीती जिल्हयातील ज्या उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑन लाईन नोंदणी केली आहे अशा सर्व उमेदवारांनी अर्ज कन्फर्म करुन व्यवसायाचा विकल्प भरावा. अर्ज भरणे व निश्चित करण्याची अंतिम दिनांक. ११ जुलै-२०२३ ही आहे असे श्री. प्रकाश खुळे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव, जि. बुलढाणा यांनी कळविले आहे.
إرسال تعليق